फलटणकरांना मोठा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:38+5:302021-02-08T04:34:38+5:30
फलटण : जिल्ह्यासह फलटण तालुक्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या ...

फलटणकरांना मोठा दिलासा
फलटण : जिल्ह्यासह फलटण तालुक्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे आज तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे.
प्रारंभीचे काही महिने तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने सुरू होते. ते राेखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. प्रशासनाने कोरोना लसीकरण मोहीम सुरू केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
थंडीची तीव्रता पुन्हा वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरसह परिसरात थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडीत अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरू लागली आहे.
हवामान विभागाने रविवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २६.३ ते किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. महाबळेश्वरात पर्यटनासाठी आलेले पर्यटक या थंड वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.