अनुदान आता दोन दिवसांत जमा
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-01T21:56:54+5:302015-01-02T00:21:14+5:30
आधारकार्ड नसेल तरी ‘नो प्रॉब्लेम’

अनुदान आता दोन दिवसांत जमा
सातारा : गॅस सिलिंडर अनुदान घेण्यासाठी कागदपत्रे जमा करावे लागणार आहे. यासंदर्भात सूचना फलकावर लावलेल्या आहेत. यासाठी आवश्यक ते दोन कागदपत्रे जमा केल्यानंतर गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यात अवघ्या ४८ तासांत जमा होणार आहेत.सातारा शहरात जिल्ह्यातील गॅस एजन्सीमध्ये सूचना फलकावर बँकेचे पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात सिलिंडर घरी नेऊन पोहोच करणारे चालकही तोंडी सांगत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये अफवांचे पेव फुटले होते. दोन वर्षांपूर्वी ‘केवायसी’ भरण्यासाठी ग्राहकांना प्रचंड पळापळ करावी लागली होती. गॅस एजन्सी, बँकेत तासन्तास रांगेत थांबावे लागले होते.
हा अनुभव गाठीशी असतानाच पंधरा दिवसांपूर्वी चालकाने दिलेल्या माहितीमुळे ग्राहकांमध्ये अफवा पसरत आहेत. पुरेसी माहितीही न घेता पळापळ सुरू केली आहे. ‘ग्राहकांची सबसीडी ग्राहकांच्या बँक खात्यात जमा’ या योजनेला १ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी ही योजना राबविली होती. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत होते. त्यांनी कोणतीही चिंता करायची कारण नाही. अशा ग्राहकांना कोणतेही कागदपत्रे देण्याची गरज नाही. ज्यांनी यापूर्वी कागदपत्रे दिलेले नाहीत, त्यांनी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतील पासबुक तसेच आधारकार्डची झेरॉक्स देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
आधारकार्ड नसेल तरी ‘नो प्रॉब्लेम’
ज्या ग्राहकांनी आधार कार्ड काढलेले नाही किंवा क्रमांक मिळालेला नाही. अशा ग्राहकांनी केवळ बँक पासबुकची झेरॉक्स दिली तरी त्यांच्या खात्यावर गॅस अनुदान जमा होणार आहे, अशी माहिती रहिमतपूर येथील गॅस सिलिंडर वितरक पंकज औंधकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ग्राहकांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. ज्या ग्राहकांनी कागदपत्रे जमा केलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकरत जमा करावेत. ही योजना राष्ट्रीय स्तरावरील या योजनेस सहकार्य करावे.
- चंद्रकांत म्हावसे,
विक्रेते, सातारा