शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

Satara: आजीचा जाळून खून करणाऱ्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:32 IST

खोटी साक्ष देणाऱ्यावर न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

सातारा : जेवण का चांगले केले नाही, या कारणावरून गीताबाई मारुती साळुंखे (वय ७८, रा. राजापुरी, ता. सातारा) यांचा जाळून खून केल्याप्रकरणी त्यांचा नातू शरद बजरंग साळुंखे (वय ३६, रा. राजापुरी, ता. सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, राजापुरी येथे ११ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी नातू शरद साळुंखे याने आजी गीताबाई साळुंखे यांना ‘दुपारी तू जेवण का चांगले केले नाहीस’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चुलीजवळ ठेवलेली राॅकेलची बाटली हातात घेऊन ‘तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत बाटलीतील राॅकेल आजीच्या अंगावर ओतले. आजी आरडाओरड करू लागली तरीही नातू शरद याने चुलीजवळची काडेपेटी घेऊन काडी ओढून आजीला पेटवून दिले. यामध्ये आजी गंभीर जखमी झाली. आजीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना आजीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नातू शरद साळुंखे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने शरद साळुंखे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सतीश राघू साळुंखे (रा. राजापुरी, ता. सातारा) याने न्यायालयात शपथेवर खोटी साक्ष दिली, हे निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्धही कारवाई करण्याचे आदेश दिले.सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक सुनील सावंत, सहायक पोलिस फाैजदार शशिकांत गोळे, अरविंद बांदल, गजानन फरांदे, रहिनाबी शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय