शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेसाठी निघालेल्या आजोबांसह नातवाचा टँकरच्या धडकेत मृत्यू, पाडेगाव येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 14:27 IST

पाडेगाव आणि बाळूपाटलाचीवाडी हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यापूर्वीच दोघांवर काळाचा घाला घातला.

लोणंद : पाडेगाव, ता. खंडाळा येथील यात्रेसाठी जात असताना टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत दिनकर धायगुडे (वय ६५), ओम विजय धायगुडे (वय १२, दोघेही रा. बाळूपाटलाचीवाडी) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा आणि नातवाचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास बाळूपाटलाचीवाडी येथे झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाडेगावची रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी आजोबा हनुमंत धायगुडे आणि नातू ओम हे लुनावरून निघाले होते. घरापासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर तीव्र उतारावर पाठीमागून टँकरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दोघेही दूरवर फेकले गेले. आजोबा हनुमंत धायगुडे आणि नातू ओम हे दोघेही गंभीर जखमी झाले. नातू ओम याला तर रक्ताची उलटी झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर काहीवेळात आजोबा हनुमंत धायगुडे यांनीही जीव सोडला.रुग्णालयात नेण्यापूर्वीच आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याचे समजताच बाळूपाटलाचीवाडीवर शोककळा पसरली. पाडेगाव आणि बाळूपाटलाचीवाडी हे अंतर अवघे तीन किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यापूर्वीच दोघांवर काळाचा घाला घातला.ओम हा पाचवीमध्ये शिकत होता. रात्री साडेनऊ शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे अधिक तपास करीत आहेत.

उताराने घेतले आजवर अनेकांचा बळी

या तीव्र उतारावर ठिकाणी अनेक अपघात झाले असून अनेकांना आपले जीव गमावावे लागले आहेत. तर कित्येकजण जखमी झाले आहेत.या ठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी रंबल स्ट्रीप्स किंवा स्पीड बेकर टाकण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात