महाबळेश्वरमध्ये आज ‘वुमन आयकॉन ऑफ सातारा’चा दिमाखदार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:46+5:302021-02-13T04:37:46+5:30
सातारा : विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा दैनिक लोकमतच्या वतीने एका दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. ...

महाबळेश्वरमध्ये आज ‘वुमन आयकॉन ऑफ सातारा’चा दिमाखदार सोहळा
सातारा : विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा दैनिक लोकमतच्या वतीने एका दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. यासाठी महाबळेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेच्या उपाध्यक्ष निलम गोऱ्हे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या २५ महिलांचा गौरव आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या ‘कॉफी टेबल’ पुस्तिकेचे प्रकाशनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
साताऱ्यातील ज्या कर्तृत्वान महिलांचा गौरव करण्यात येणार आहे, त्यामध्ये वेदांतिकाराजे भोसले, ॲड. मधुबाला भोसले, दीपाली भागवत, वैशाली भट, प्रतिमा चव्हाण, मनीषा कूपर, मारोख कूपर, डॉ. स्वाती देशपांडे, रश्मी एरम, शोभना गुदगे, माधवी कदम, सुनीता कदम, मंजिरी खुस्पे, अनुराधा कोल्हापुरे, स्वाती ओक, डॉ. मनीषा पाटील, सुवर्णादेवी पाटील, प्रीती रेवले, कांचन साळुंखे, चंद्राबेन शहा, डॉ. भाग्यश्री शिंदे, स्वप्नाली शिंदे, चेतना सिन्हा, रूपल तेजानी आणि सिलिन वायापुली यांचा समावेश आहे.
महाबळेश्वर येथील हॉटेल गौतम येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शिक्षण, बँकिंग, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.