खराडे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:40 IST2021-04-22T04:40:00+5:302021-04-22T04:40:00+5:30

मसूर : खराडे (ता. कऱ्हाड) येथे संतोष जाधव क्रीडा मंडळ व मावलाई देवी सप्लायर्स व ग्रामस्थांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात ...

Gramsvachchata Abhiyan on behalf of Kharade villagers | खराडे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान

खराडे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान

मसूर : खराडे (ता. कऱ्हाड) येथे संतोष जाधव क्रीडा मंडळ व मावलाई देवी सप्लायर्स व ग्रामस्थांच्यावतीने ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले.

यावेळी रेल्वे गेटपासून ते जुने गावठाणच्या दोन्ही बाजूच्या नाल्यातील सफाई करण्यात आली. तसेच नवीन गावठाण येथील ग्रामपंचायत परिसर स्वच्छ करण्यात आला.

संतोष जाधव म्हणाले, ‘सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाला जर वेशीबाहेर ठेवायचे असेल तर गावामध्ये स्वच्छता असणे गरजेचे आहे, हे ओळखून एक पाऊल स्वच्छतेकडे हा संदेश घेऊन गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. त्याला ग्रामस्थांनी लगेच होकार दिला. बघता-बघता कामाला सुरुवात झाली व गाव स्वच्छ झाला.’

या उपक्रमासाठी लागलेले जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर मावलाई देवी सप्लायर्सच्यावतीने मोफत देण्यात आले. ग्रामस्वच्छता अभियानात संजय जाधव, जालिंदर जाधव, सुभाष जाधव, सुनील जाधव, दादासोा मोरे, जयवंत नाना, विकास जाधव, संतोष जाधव तसेच क्रीडा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Gramsvachchata Abhiyan on behalf of Kharade villagers