ग्रामसेवकाने हडपले १0.६८ लाख
By Admin | Updated: June 9, 2014 01:17 IST2014-06-09T01:15:41+5:302014-06-09T01:17:06+5:30
पवारवाडीतील प्रकार : खोट्या सह्या करून अपहार

ग्रामसेवकाने हडपले १0.६८ लाख
सणबूर : पाटण तालुक्यातील पवारवाडी-कुठरे येथील सरपंचांच्या खोट्या सह्या करून ग्रामसेवक पांडुरंग विठोबा करे याने शासकीय करवसुलीचे १०.६८ लाख रुपये हडप केले. याप्रकरणी ग्रामविस्तार अधिकारी वसंत मुळे यांनी ढेबेवाडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर ग्रामसेवक करे यास अटक करण्यात आली.
ग्रामविस्तार अधिकारी मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पांडुरंग करे (सध्या रा. मलकापूर, मूळ रा. खडनाळ, पो. दरीबडची, ता. जत) पवारवाडी येथे ग्रामसेवक असताना १९ जुलै ते ११ डिसेंबर २०१३ या कालावधीत त्याने ग्रामपंचायतीकडे आलेले शासकीय अनुदान व करवसुलीचे १० लाख ६८ हजार १४ रुपये परस्पर हडप केले. त्यासाठी त्याने सरपंच अशोक प्रभाकर पवार यांच्या खोट्या सह्या केल्या आणि रकमेचा धनादेश बँकेत वटवून पैसे काढून घेतले, तसेच रोजकीर्दमध्ये खोटा मजकूर लिहून शासन आणि ग्रामपंचायतीची आर्थिक फसवणूक केली. दरम्यान, ढेबेवाडी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर करे याला अटक केली. (प्रतिनिधी)