गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST2021-03-13T05:10:39+5:302021-03-13T05:10:39+5:30

खटाव : ‘ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लहान-मोठे विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढेही गावाच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ...

Gram Panchayat committed for the development of the village: Patil | गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध : पाटील

गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध : पाटील

खटाव : ‘ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लहान-मोठे विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यापुढेही गावाच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहे,’ असे प्रतिपादन राहुल पाटील यांनी केले.

खटाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधांतर्गत ग्रामपंचायत निधीमधून भवानीटेक येथील सहा लाख रुपयांचा रस्ता, तसेच शास्त्रीनगर येथे सात लाखांचे बंदिस्त गटार, इंदिरानगर येथे दोन लाखांचे बंदिस्त गटार याच्या कामाचा प्रारंभ व भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बोर्गे, राहुल जमदाडे, दीपक घाडगे, मनीषा कुंभार उपस्थित होते. (वा.प्र.)

११खटाव-पाटील

खटाव येथे विविध कामांचे भूमिपूजन राहुल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आहे. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)

Web Title: Gram Panchayat committed for the development of the village: Patil