अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचा लाभ सोडावा : सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:45+5:302021-02-05T09:18:45+5:30

औंध : ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी स्वतःहून अन्नसुरक्षा अनुदान योजनेतून मिळणाऱ्या धान्याचा लाभ सोडावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी शैलेश ...

Grain benefits under food security scheme should be given up: Suryavanshi | अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचा लाभ सोडावा : सूर्यवंशी

अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचा लाभ सोडावा : सूर्यवंशी

औंध : ‘आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी स्वतःहून अन्नसुरक्षा अनुदान योजनेतून मिळणाऱ्या धान्याचा लाभ सोडावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले. औंध येथील यशवंत सुकटे यांच्या स्वस्त धान्य भेटीनंतर ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी तालुका पुरवठा अधिकारी श्रीकांत शेंडे, पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे, नितीन सुकटे, सतीश देशमुख, प्रकाश आमले, दीपक कुंभार, बंडा हिंगे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

सूर्यवंशी म्हणाले, ‘अनेक गरजू रेशनकार्डधारक आजही रेशनपासून वंचित आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखरच पीएचएच योजनेची गरज नाही. त्यांनी स्वेच्छेने या योजनेतून स्वत:हून बाहेर पडावे. गरजू व आवश्यक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी अनेक ग्राहकांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊ, अशी ग्वाही प्रांताधिकारी सूर्यवंशी यांना दिली.

यावेळी यशवंत सुकटे यांच्या धान्य दुकानाची दप्तर तपासणी करून सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवल्याबद्दल प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त करून खटाव-माण तालुक्यातील धान्य दुकानांची यापुढे नियमित तपासणी करणार असल्याचे सांगून सर्व धान्य दुकानदार, महसूल विभागातील अधिकारी, पुरवठा शाखेतील अधिकारी यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून आवश्यक गरजू लाभार्थ्यांना जास्तीत जास्त धान्य मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

Web Title: Grain benefits under food security scheme should be given up: Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.