गटशिक्षणाधिकारी जाळ्यात

By Admin | Updated: July 21, 2015 00:37 IST2015-07-21T00:37:55+5:302015-07-21T00:37:55+5:30

पाटणला कारवाई : पगाराच्या बिलासाठी घेतली एक हजाराची लाच

The Govt | गटशिक्षणाधिकारी जाळ्यात

गटशिक्षणाधिकारी जाळ्यात

पाटण : पाटण पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकाऱ्यास एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वेतनाच्या फरकाचे बिल खात्यात जमा करण्यासाठी त्याने लाच मागितल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. विलास पोपट भागवत (वय ५५, मूळ रा. कोष्टी गल्ली, म्हसवड, ता. माण, सध्या रा. चौधरी गल्ली पाटण) असे पकडण्यात
आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे.
चट्टोपाध्याय वेतनश्रेणीनुसार दि. २७ जुलै २०१० ते ३० सप्टेंबर २०१३ या कालावधीतील पगाराच्या फरकाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी एक हजाराची लाच भागवतने मागितल्याचे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.तक्रारीनुसार सापळा लावून गटशिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना त्याच्या राहत्या घरीच पकडण्यात आले.
त्याच्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
(प्रतिनिधी)

Web Title: The Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.