शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावले कासव गतीने - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 01:06 IST

म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.

म्हसवड (जि.सातारा) : दुष्काळी परिस्थिती आल्यावर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते. परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.पवार म्हणाले, आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहेच. राज्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा.पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीतपवार यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसान भरपाई मिळाली का? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.खासदार निधीतून दीड कोटीमाण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावे दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी डिझेलसाठी खर्च म्हणून खासदार निधीतून दीड कोटी रुपये लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. पवार यांनी माण तालुक्याच्या दौºयात शिंदी खुर्द येथे कामाची पाहणी केली.गावांसाठी तीस टँकरमाण, खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोहित पवार यांच्यातर्फे तीस टँकर पुरवण्यात येणार आहेत. हे टँकर पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी होईल, त्या गावांना मोफत पाणी पुरवठा करतील, असे ते म्हणाले.चंद्रकांत पाटील यांना विचारला भावनिक प्रश्नमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २३ तारखेला बारामतीत अवश्य विजयोत्सव साजरा करावा. बारामतीचा आनंद घ्यायचा असेल तर तो त्यांनी अवश्य घ्यावा. तो प्रश्न नाही; पण येथे आज लोकांना पाणी नाही, जनावरांना चारा, पाणी नाही. माणुसकी म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही? असा सवाल पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना केला.असा होता दौरा..पवार सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. बिजवडी, शिंदी येथे त्यांनी भेट दिली. वावरहिरे ग्रामस्थांशी संवाद साधला. भालवडी चारा छावणीस भेट दिली. पानवणला पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळ