दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासकीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:16+5:302021-05-05T05:03:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या कालावधीसाठी शासकीय कार्यातील दिव्यांग अधिकारी आणि ...

दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासकीय
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या कालावधीसाठी शासकीय कार्यातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूट देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सोमवारी काढला आहे.
शासनाच्या या आदेशानुसार सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव आहे. शासकीय कार्यालयांमध्ये रोटेशन पद्धतीने काही टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत कर्मचाऱ्यांचे काम सुरू आहे. असे असताना दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसते. त्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करणे कष्टप्रद व त्रासदायक होत असते. याचा विचार करून सर्व दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात येत आहे. तसेच त्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या सुट्टीमुळे कामात अडचण येणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक संबंधितांनाही पाठविण्यात आले आहे.
.........................................................................