पंतप्रधान कार्यालयाला पाठविल्या गोवऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST2021-09-05T04:44:52+5:302021-09-05T04:44:52+5:30

सातारा : केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे दिवसेंदिवस गॅस दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी टीका करत राष्ट्रवादी ...

Govarya sent to the Prime Minister's Office | पंतप्रधान कार्यालयाला पाठविल्या गोवऱ्या

पंतप्रधान कार्यालयाला पाठविल्या गोवऱ्या

सातारा : केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे दिवसेंदिवस गॅस दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, अशी टीका करत राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली केंद्र शासनाचे गणित सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे, त्यांना ही दरवाढ जीवन नकोसं करणारा आहे. त्यामुळे आता खरे पाऊल उचलावे लागत आहे. केंद्र सरकार सामान्य जनतेच्या सामान्य अपेक्षाही पूर्ण करू शकत नाही. वारंवार होणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसच्या किमती वाढवणार सरकारचे बिलकुल नियंत्रण आहे, त्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी करून घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीसंदर्भात पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पाठवून समस्त महिला निषेध व्यक्त करीत आहेत.

फोटो ओळ : सातारा येथील पोस्ट कार्यालयात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे केंद्र शासनाच्या गॅस दरवाढीविरोधात निषेध करण्यात आला.

फोटो नेम : 04सागर

सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय केंद्र सरकारने घेतला नाही चुकीचे अच्छे दिन आणल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन, अशी उपरोधिक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव यांनी केले आहे.

Web Title: Govarya sent to the Prime Minister's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.