गोरक्षनाथ देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:30+5:302021-08-25T04:43:30+5:30
गमेवाडी येथील गोरक्षनाथ देवस्थान सतराव्या शतकातील आहे. या देवस्थानची सेवा परंपरेने रवींद्र माने व पांडुरंग माने महाराज यांनी ...

गोरक्षनाथ देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्र!
गमेवाडी येथील गोरक्षनाथ देवस्थान सतराव्या शतकातील आहे. या देवस्थानची सेवा परंपरेने रवींद्र माने व पांडुरंग माने महाराज यांनी त्यावेळेपासून सुरू ठेवली आहे. मारुती माने यांनी १९८२ ला पूर्वापार सुरू असलेल्या भंडाऱ्याला मोठ्या प्रमाणात पारायण आयोजित करून आध्यात्मिक स्वरूप दिले. त्यामुळे मोठे कार्यक्रमही होऊ लागले. चैत्र कृष्ण पंचमीला भागातील ग्रामस्थांच्या माध्यमातून पारायण सोहळा सुरू होतो. धार्मिक, समाज प्रबोधनपर कार्यक्रमांनी तो सोहळा साजरा होतो. गोरक्षनाथ देवस्थानची महती मोठी आहे. गुरुवारी तेथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिराळा येथील पुण्यतिथी कार्यक्रमानेच चैत्र कृष्ण द्वादशीला पारायणाची सांगता होते. नवनाथातील एक गोरक्षनाथ देवस्थान हे प्रसिद्ध ठिकाण आहे. सध्या सुमारे ३० फूट घेरा असलेले एक झाड त्याठिकाणी अस्तित्वात असून, तेथे मंदिरही आहे.
परिसरामध्ये प्रचंड वनसंपदा व वन्यप्राणी, पक्षी यांचे वैभव आहे. या देवस्थानला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता तेथे पर्यटनाभिमुख सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातून ते एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणार आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थ, भाविकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.