सूर्यनमस्कार स्पर्धेला चांगला प्रतिसाद
By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T21:07:56+5:302015-01-21T23:53:28+5:30
नाटळ विद्यालय : अडीचशे विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

सूर्यनमस्कार स्पर्धेला चांगला प्रतिसाद
कनेडी : नाटळ येथील माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत घेण्यात आलेल्या सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
या स्पर्धेत यशस्वी स्पर्धक अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकानुसार पुढीलप्रमाणे - पाचवी ते सहावी (अ गट) मुली - सुमन ठाकूर, सायली तेली, साक्षी मुरकर, संचिता पावसकर, पूजा पवार. (ब गट) - रोशनी परब, विशाखा
सावंत, मयूरी यादव, बंदिनी सावंत, श्रुती सावंत, पौर्णिमा सावंत. (क गट) - समीक्षा ताम्हाणेकर, उर्वी म्हाडेश्वर, प्रियांका पवार, प्रमिला वायंगणकर, आदिती निकम, सानिका सरंगले. मुले - (अ गट) - स्वप्निल सावंत, नीळकंठ खोचरे, ओमकार महाडिक, लक्ष्मण चव्हाण, प्रथमेश सावंत. (ब गट) - साईराज सरंगले, रोशन कदम, विकास खरात, जयेश केरे, सूरज मेस्त्री. (क गट) - शैलेश गावडे, सिद्धेश पारकर, सुहाग नाटळकर, अक्षय गावडे, अभिषेक गोसावी.यावेळी अरुण वळंजू यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांना समर्थ भारत अपेक्षित होता. यासाठी समाजातील बलवान युवा वर्ग तयार केला पाहिजे. तो खेळातूनच तयार होईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्या...
शासनाने क्रीडा संचालनालयाच्यावतीने माध्यमिक शाळांमध्ये स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. प्रशिक्षणाचा लाभ विद्यार्थी - विद्यार्थिनींनी अवश्य घ्यावा व भावी आयुष्यात स्वयंसिद्ध होऊन वावरावे, असे आवाहन नाटळ विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय मुंडले यांनी केले. एकनाथ धनवटे व सुप्रिया गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण झाले.