इंद्रधनू पार्कमध्ये स्वप्नातील खरेदी करण्याची सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST2021-01-24T04:18:44+5:302021-01-24T04:18:44+5:30

वाई : ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कृष्णा तीरावर वसलेल्या वाई शहरात कोल्ड स्टार डेव्हलपर्सचे संचालक अनिल शेंडे व आनंद ...

A golden opportunity to shop in a rainbow park | इंद्रधनू पार्कमध्ये स्वप्नातील खरेदी करण्याची सुवर्णसंधी

इंद्रधनू पार्कमध्ये स्वप्नातील खरेदी करण्याची सुवर्णसंधी

वाई : ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कृष्णा तीरावर वसलेल्या वाई शहरात कोल्ड स्टार डेव्हलपर्सचे संचालक अनिल शेंडे व आनंद कुलकर्णी यांनी ग्राहकांना केंद्रबिंदू मानून वाई शहरालगत औद्योगिक वसाहत परिसरात ‘इंद्रधनू पार्क’ हा निसर्गरम्य प्रकल्प साकारला आहे.

सामान्य कुटुंबातून आल्यामुळे नेहमीच सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व ग्राहकांशी सदैव सहकार्याची भूमिका ठेवल्याने व ग्राहकांना माफक दरामध्ये उत्तम दर्जा, तत्पर सेवा, निर्धारित वेळेत काम पूर्ण करून दिल्यामुळे असंख्य समाधानी ग्राहक हीच आपली फलनिष्पत्ती मानून कोल्ड स्टार डेव्हलपर्सने आपला व्यवसाय दिवसागणिक वाढवला. संचालक अनिल शेंडे हे व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रमात कार्यरत असतात. कोरोनासारख्या वैश्विक संकटात संपूर्ण लाॅकडाऊनमध्ये समाजाच्या सुरक्षेसाठी रात्रं-दिवस झटत असलेल्या कोरोना योद्धे पोलिसांना सहा महिने जेवणाची पाकिटे व पाणी एक सामाजिक दायित्व म्हणून शेंडे आणि मित्रपरिवार वाई शहरात पुरवत होते. त्यांनी सदैव जनसेवेचा वसा जपला आहे. कोल्ड स्टार डेव्हलपर्सच्या माध्यमातून निसर्गरम्य ठिकाणी बजेटमध्ये रो-हाऊस खरेदीची सुवर्णसंधी आहे.

रजिस्ट्रेशन, जीएसटीसहीत किंमत फक्त ३५ लाख ५१ हजार असून, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व असलेल्या निसर्गरम्य वाईच्या परिसरात साकारण्यात आलेला देखणा, दर्जेदार असा हा प्रकल्प आहे, हवेशीर निसर्गरम्य ठिकाण, अतिशय माफक दरात आकर्षक व दर्जेदार रो-हाऊस दीड गुंठ्यात बांधकाम ग्राऊंड ५७५ स्वे. फूट हाॅल व किचन, पहिला मजला ५७५ स्वे. फूट यामध्ये दोन मास्टर बेड, पाठीमागे ४०० स्वे. फूट गार्डन, पुढे ४०० स्वे. फूट पार्किंग असा देखणा प्रकल्प आहे. आपल्या स्वप्नातील घर बुक करा आणि आपला आनंद द्विगुणीत करा, असे आवाहन कोल्ड स्टार डेव्हलपर्सच्या संचालकांनी केेले आहे.

Web Title: A golden opportunity to shop in a rainbow park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.