सुदेष्णा शिवणकरला सुवर्ण, कास्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST2021-02-14T04:37:31+5:302021-02-14T04:37:31+5:30
राष्ट्रवादीचा उद्या जनता दरबार सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांचा जनता दरबार सोमवार, दि. १५ रोजी ...

सुदेष्णा शिवणकरला सुवर्ण, कास्यपदक
राष्ट्रवादीचा उद्या जनता दरबार
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार शशिकांत शिंदे यांचा जनता दरबार सोमवार, दि. १५ रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवन येथे होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा दरबार होणार आहे. नागरिकांनी आपल्या समस्या, प्रश्नांबाबत लेखी निवेदनासह राष्ट्रवादी भवनात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले आहे.
कोरेगावात श्रमदान शिबिर
सातारा : कऱ्हाडमधील यशवंतराव मोहिते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील समाजकार्य पदविका वर्गाकडून कोरेगाव येथे एकदिवसीय श्रमदिन शिबिर झाले. विद्यार्थ्यांकडून गावात सार्वजनिक स्वच्छता अभियान, तसेच सिद्धनाथ मंदिर परिसरात मुरूम भराव व वृक्षारोपण झाले. इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख प्रा. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. प्रा. डी. पी. म्होप्रेकर, सरपंच अलका पाटील, उपसरपंच शुभांगी सावंत, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत दाभाडे, अविनाश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.