राष्ट्रीय सेवा योजनाला गौरवशाली परंपरा : बन्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST2021-06-20T04:25:49+5:302021-06-20T04:25:49+5:30

नागठाणे : ‘राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन पातळीवर सामाजिक कार्य करणारी गौरवशाली परंपरा असणारी राष्ट्रव्यापी योजना आहे. शिवाजी विद्यापीठाची ...

Glorious tradition of National Service Scheme: Bansal | राष्ट्रीय सेवा योजनाला गौरवशाली परंपरा : बन्सल

राष्ट्रीय सेवा योजनाला गौरवशाली परंपरा : बन्सल

नागठाणे : ‘राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन पातळीवर सामाजिक कार्य करणारी गौरवशाली परंपरा असणारी राष्ट्रव्यापी योजना आहे. शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना ही या परंपरेप्रमाणे कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यंत क्रियाशीलपणे काम करत आहे,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने आयोजित ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियानाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील होते.

बन्सल म्हणाले, ‘कोरोनामुक्त होण्याकडे जिल्हा वाटचाल करत असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये. आपल्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे कोरोनाच्या युद्धात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची भूमिका मोलाची आहे. ही भूमिका शिवाजी विद्यापीठ पार पाडत आहे.’

डॉ. पी. एस. पाटील म्हणाले, ‘कोरोना महामारीने देशाच्या सीमेच्या मर्यादा पार केल्या आहेत. कोरोनाने रौद्ररूप धारण केले नाही, असा एकही देश नाही. भारतात दुसऱ्या लाटेत कोरोनाने खूप हानी पोहोचवली आहे, अशास्थितीत जनजागृती, समुपदेशनातून मानसिक आधार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन याची गरज ओळखून शिवाजी विद्यापीठाने गावपातळीवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वतः जबाबदारी घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोनाचे सर्व नियम पाळून शिवाजी विद्यापीठ कोरोनाच्या लढाईत काम करेल.’

प्रा. अभय जायभाये यांनी प्रास्तविक केले. प्रा. शिवाजी चव्हाण, प्रा. आनंद घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Glorious tradition of National Service Scheme: Bansal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.