चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:04 IST2021-02-05T09:04:48+5:302021-02-05T09:04:48+5:30

औंध : औंध-गोपूज रस्त्यावर नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या काचा अज्ञातांकडून फोडण्यात आल्या. यामध्ये ...

The glass of the four-wheeler was broken | चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या

चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या

औंध : औंध-गोपूज रस्त्यावर नादुरुस्त असल्याने रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या काचा अज्ञातांकडून फोडण्यात आल्या. यामध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, औंध येथील हॉटेल व्यावसायिक सुधीर फडतरे यांच्या (एमएच १२ डीजी ८७६२) या गाडीचा ३१ जानेवारी रोजी ॲक्सल तुटल्याने गाडी रस्त्याकडेला उभी करण्यात आली होती. सोमवार, दि. १ रोजी दिवसभर कारागीर आला नसल्यामुळे गाडी रात्रभर त्याच ठिकाणी उभी होती. फडतरे हे मंगळवारी गाडीजवळ गेले असता अज्ञातांनी गाडीच्या पुढच्या व मागच्या काचा फोडून टाकल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे हे कृत्य चोरीच्या उद्देशाने केले नसून गाडीतील सर्व साहित्य जागेवरच जसेच्या तसे होते. गाडीत स्टेफनी, जॅक, पाने, टेपरेकॉर्डर आहे तसेच होते. त्यामुळे जाणूनबुजून केलेल्या या कृत्यामुळे अज्ञाताला काय मिळाले तसेच या घटनेचा सोशल मीडियावर औंध परिसरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

०२औंध

औंध-गोपूज रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या वाहनाच्या काचा फोडून अज्ञाताने नुकसान केले आहे. (छाया : रशिद शेख)

Web Title: The glass of the four-wheeler was broken