शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

..अन् रागाने चायनीज चालकाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:00 IST

तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले.

सातारा : उधारी दिलेले पैसे मागितल्याने चायनीज चालकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अजय आणि ईश्वर बापू मोरे (रा. गेंडामाळ, झोपडपट्टी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकरराव रामुहरी नायक (वय ४०, सध्या रा. रविवार पेठ, सातारा मूळ रा. ओरिसा) यांचा आयटीआयजवळील भिंतीच्या कडेला चायनीजचा गाडा आहे. या गाड्यावर मागील उधारीच्या कारणावरून संशयितांनी नायक यांना काही दिवसांपूर्वी शिवीगाळ व दमदाटी केली होती. दरम्यान, दि. ११ रोजी रात्री साठेआठच्या सुमारास वरील दोघे संशयित पुन्हा त्यांच्या गाड्याजवळ आले. दोघांनी ट्रीपल राईस मागितले.राईस ते बनवत असताना ईश्वर मोरे अचानक तेथे गेला. तुला मस्ती आली आहे का, तुला पैसे पाहिजेत का, असे म्हणून त्याच्या हातातील काचेची बाटली नायक यांच्या डोक्यात मारली. यात ते गंभीर जखमी झाले. असे असतानाही गाड्यावरची सुरी घेऊन मोरे हा नायक यांच्या अंगावर जाऊन तुला आता कापतोच, अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर नायक यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली. सहायक फाैजदार निकम हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी