जिल्ह्यातील लोकांना टोल माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:38 IST2021-04-11T04:38:22+5:302021-04-11T04:38:22+5:30

कोरेगाव : पुणे-बंगळुरू महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोल नाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि ...

Give toll waiver to the people of the district | जिल्ह्यातील लोकांना टोल माफी द्या

जिल्ह्यातील लोकांना टोल माफी द्या

कोरेगाव : पुणे-बंगळुरू महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोल नाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोल नाक्यावर जिल्हावासियांना ही सुविधा नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून शासनाने जनतेचा अंत पाहू नये. लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन केले जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद, आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिंदे यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात टोलनाक्यांवर टोल भरावा लागत आहे. आता १ एप्रिलपासून टोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. २००६ सालापासून २०२१ साल उजाडले तरी अद्याप पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाचे काम सुरूच आहे. काम पूर्णात्वास गेलेले नाही. काहीजणांनी टोलच्या दरात पाच टक्के कपात करण्याविषयी मागणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र, आम्ही पहिल्यापासून जिल्ह्यातील टोल नाक्यांवर एमएच ११ आणि एमएच ५० अशी नोंदणी असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, अशी आमची मागणी आहे.

आता टोल नाक्यांवर ठेकेदार बदलला आहे. रिलायन्स इन्फ्राकडे महामार्ग निर्मितीचे काम आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी अद्याप पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाचे काम सुरूच आहे. तरी देखील दरवर्षी टोलच्या दरात वाढ केली जात आहे. याबाबत आम्ही राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर हा विषय केंद्र शासनाशी निगडीत असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र शासन कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम का करत आहे, हा प्रश्न उपस्थित होतो, असेही आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

चौकट :

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे...

सद्य:स्थितीत लॉकडाऊन असल्याने टोलच्या विषयामध्ये सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांना आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या विषयामध्ये तातडीने लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आमदार शिंदे यांनी केली आहे.

..................................................................................

Web Title: Give toll waiver to the people of the district