भटक्या समाजाला राहण्यासाठी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:24 IST2021-07-09T04:24:49+5:302021-07-09T04:24:49+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यात भटक्या विमुक्त जाती जमाती गोपाळ समाजाला राहण्यासाठी जागा व घरकुल मिळावी, यासाठी खंडाळा ...

Give the nomadic community a place to live | भटक्या समाजाला राहण्यासाठी जागा द्या

भटक्या समाजाला राहण्यासाठी जागा द्या

खंडाळा : खंडाळा तालुक्यात भटक्या विमुक्त जाती जमाती गोपाळ समाजाला राहण्यासाठी जागा व घरकुल मिळावी, यासाठी खंडाळा तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

या मागणी संदर्भाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या वतीने खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन दिले. या वेळी जिल्हा सरचिटणीस सुदाम जाधव, अमर पवार, बाळासाहेब जाधव, महादेव जाधव, एकनाथ चव्हाण यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, भटक्या विमुक्त जाती जमाती गोपाळ समाज हा डोंबारी खेळ करणारा समाज आहे. या समाजातील लोकांना आजसुद्धा शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. या समाजाला ना घर, ना दार अशी अवस्था बिकट होऊ लागली आहे. तरी शासनाने गोपाळ समाजाला तालुक्यात शासकीय जमीन उपलब्ध करून घरकुल द्यावी, अशी मागणी केली आहे.

.................................

Web Title: Give the nomadic community a place to live