रहिमतपूर : ‘माझ्यावर ७० हजार कोटींचा घोटाळा केला म्हणून आरोप केला; परंतु यामध्ये काही तथ्य नाही. या प्रकरणात माझ्या नातेवाइकांच्या घरी छापे टाकण्यात आले. काही सापडलं नाही. परंतु प्रचंड त्रास सहन करावा लागला. तुम्हाला वाटतच असेल तर त्यातील फक्त शंभर कोटीच मला द्या. माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल,’ असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.रहिमतपूर येथे रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘जरंडेश्वर साखर कारखाना अडीच हजार क्षमतेचा. तो या भागातल्या लोकांना चालवता आला नाही; परंतु मी आता मोठ्या क्षमतेने आणि ताकदीने चालवतोय. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देतोय. माझ्यापेक्षा दुसरा इतर कुठला कारखाना जास्त दर देत असेल तर शेतकऱ्यांनी त्या कारखान्याला ऊस घालवा. परंतु या भागातील काही कारखानदारांनी गेल्या वर्षीचे अजून पैसे दिले नाहीत, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केल्या आहेत. शेतकऱ्यांना जिथे ऊस घालायचा असेल तिथे ऊस घालावा; पण पैसे देणाऱ्या कारखान्याकडेच घालावा.’रहिमतपूर परिसरातील रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केले गेले आणि त्यासाठी सुनील माने उपोषणाला बसले होते. मी माझ्या बारामतीमध्ये रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची करून घेतो. सकाळी सहा वाजताच कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतो. राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी पुणे जिल्हा बँक उत्तम चालली आहे. सातारा जिल्हा बँक आज राज्यात एक नंबरला आहे.
यांनी केला प्रवेशराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यासह माजी नगरसेवक, पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी (अजितदादा गट) काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
Web Summary : Ajit Pawar refuted corruption allegations, sarcastically requesting a smaller sum. He highlighted efficient sugar factory management, urging farmers to choose prompt-paying factories. He also praised road work quality and cooperative bank performance at Rahimatpur event.
Web Summary : अजित पवार ने भ्रष्टाचार के आरोपों का खंडन किया, व्यंग्यात्मक रूप से छोटी राशि का अनुरोध किया। उन्होंने कुशल चीनी मिल प्रबंधन पर प्रकाश डाला और किसानों से तुरंत भुगतान करने वाली मिलों को चुनने का आग्रह किया। उन्होंने रहिमतपुर कार्यक्रम में सड़क निर्माण की गुणवत्ता और सहकारी बैंक के प्रदर्शन की भी प्रशंसा की।