बाग विकसित करण्यासाठी निधी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:22+5:302021-09-03T04:40:22+5:30

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी, नाना चौगुले, लोकशाही आघाडीचे सहसचिव मुसद्दीक आंबेकरी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाड ...

Give funds to develop the garden! | बाग विकसित करण्यासाठी निधी द्या!

बाग विकसित करण्यासाठी निधी द्या!

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अख्तर आंबेकरी, नाना चौगुले, लोकशाही आघाडीचे सहसचिव मुसद्दीक आंबेकरी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाड ग्रामीण नव्याने शहरात समाविष्ट झाले. त्यानंतर याठिकाणी पायाभूत सुविधा पालिका मोठ्या प्रमाणात करीत आहे. रस्ता, ड्रेनेज, चोवीस तास पाणी, गटर तसेच व्यायाम शाळा, सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा पालिकेने केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या पूर्ण परिसरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना व्यायामासाठी बगीच्या मंजूर होणे गरजेचे आहे. ज्यामुळे हा परिसर विकसित होऊन नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

दरम्यान, याबाबतचा आराखडा मोहसीन आंबेकरी यांनी तयार केला असून, हा आराखडाही बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. बगीच्यासाठी ४० लाख रुपय निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या आराखड्यात ओपन जिम, इनडोअर जिम, लहान मुलांची खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रॅकर, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी निवाऱ्यासाठी टेन्ट याचा समावेश आहे.

Web Title: Give funds to develop the garden!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.