वंचित घटकांना घरकुलाचा लाभ द्या : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST2021-02-12T04:37:08+5:302021-02-12T04:37:08+5:30

सातारा : ‘शासनाने वंचित घटकांना घर, जागा देण्याच्यादृष्टीने घोषणा केली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी,’ अशी मागणी लोकसाहित्यिक ...

Give the benefit of Gharkula to the deprived sections: Chavan | वंचित घटकांना घरकुलाचा लाभ द्या : चव्हाण

वंचित घटकांना घरकुलाचा लाभ द्या : चव्हाण

सातारा : ‘शासनाने वंचित घटकांना घर, जागा देण्याच्यादृष्टीने घोषणा केली आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी,’ अशी मागणी लोकसाहित्यिक अण्णा भाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली आहे.

सातारा येथील वंचित समाज मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी अनिल मोहिते, अजय राठोड, उज्वला जगदाळे, नलिनी घाडगे, सुजाता गायकवाड, रुपीता पवार, विमल शिंदे आदी उपस्थित होते.

उमेश चव्हाण म्हणाले, ‘शासनाने २०२२ पर्यंत वंचित घटकाला घरकुल योजेनचा लाभ देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत जिल्ह्यातील प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही. अण्णाभाऊ साठे कृती समितीने जिल्ह्यातील अनेक समाजाचा सर्व्हे केला असून, लवकरच घरकूल परिषद घेणार आहे. त्यानंतर लोकांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.’

फोटो दि.१०सातारा घरकूल फोटो... (फोटो आवश्यक)

फोटो ओळ : सातारा येथील वंचित समाजाच्या मेळाव्यात उमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

.............................................................

Web Title: Give the benefit of Gharkula to the deprived sections: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.