वंचित घटकांना घरकुल योजनेचा लाभ द्या : उमेश चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:09+5:302021-02-05T09:09:09+5:30
सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाचे स्वत:चे घर असेल असे सांगत घरकुल योजना जाहीर केली ...

वंचित घटकांना घरकुल योजनेचा लाभ द्या : उमेश चव्हाण
सातारा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाचे स्वत:चे घर असेल असे सांगत घरकुल योजना जाहीर केली आहे. या योजनेचा वंचित घटकांना लाभ द्यावा,’ असे आवाहन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले आहे.
सातारा येथील मेळाव्यात चव्हाण बोलत होते. केंद्र शासनाने घरकुल योजना सुरू केली आहे. मात्र, ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे याचा सर्व्हे अण्णा भाऊ साठे कृती समितीने करून लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. या लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला.
उमेश चव्हाण म्हणाले, ‘जिल्ह्यात कोणाला स्वत:ची घरे नाहीत, अशांना केंद्र शासनाच्या धोरणानुसार घरकुले मिळाली पाहिजेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कृती समितीने सामाजिक बांधीलकीतून याचा सर्व्हे सुरू केल्यावर विविध जातिधर्मातील घर नसलेल्या कुटुंबांची माहिती समोर आली. त्यांची यादी तयार करून घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव खासदार, पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यापुढे या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.’
यावेळी दलित महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, अजय राठोड, महिबूब मुल्ला, उज्ज्वला जगदाळे, सुजाता गायकवाड, ओंकार निकम, विमल शिंदे, आदींची उपस्थिती होती.
\\\\\\\\\\\\\\\\\