शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाई खोऱ्यातील अनपटवाडीत मुलींचीच मनसबदारी ! प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर : स्त्री जन्माचा अवघ्या गावाला अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:32 IST

सातारा : पुरुषी मानसिकतेमुळे समाजात आजही स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटना घडत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा अनादरही केला जातो. मात्र,

सचिन काकडे ।सातारा : पुरुषी मानसिकतेमुळे समाजात आजही स्त्रीभ्रूण हत्यासारख्या घटना घडत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा अनादरही केला जातो. मात्र, वाई तालुक्यातील अनपटवाडी या गावातील मुली व महिलांची आज सर्वच क्षेत्रांत मनसबदारी पाहायला मिळते. या गावाने श्री ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून स्त्रीत्त्वाचा आदर करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी नव्या योजना हाती घेतल्या आहेत.

अनपटवाडी हे ३७५ लोकसंख्या असलेलं छोटसं गाव. या गावातील काही कर्ती पुरुष मंडळी अन्य शहरात नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक झाली आहेत. तर काही शेती व इतर व्यवसायाशी जोडले गेले आहेत. युवकांनी एकत्र येऊन १९९८ रोजी श्री ग्राम विकास मंडळाची स्थापना केली अन् पुढे गावाच्या विकासाची खºया अर्थाने सुरुवात झाली. या मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वप्रथम ‘लेक वाचवा, लेक वाढवा आणि लेक शिकवा’ हे अभियान सुरू करून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. या अभियानाचे दुरगामी परिणाम आज दिसून येत आहे. गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते. गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत करण्याबरोबच उच्च शिक्षणासाठी सहकार्यही केले जाते. अनेक कार्यक्रम महिलांच्या पुढाकारातून साजरे केले जातात.

प्रजासत्ताकदिनी झेंडा वंदनाचा मान हा गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा असतो, परंतु ग्रामपंचायतीने यावेळी हा बहुमान शाळेतील आपल्या लेकींना दिला. प्रजासत्ताक दिनी मुलीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एवढेच नव्हे तर मुलींची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली. या गावातील मुली व महिलाच नव्हे तर सुनाही उच्चशिक्षित आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ग्राम विकास मंडळाच्या वतीने सर्वांचा गौरवही केला जातो. मंडळाचे अध्यक्ष अनिल अनपट, सचिव हणमंत मांढरे, नितीन मांढरे, सयाची अनपट, सरपंच मोहन अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली अनपटवाडी गावाने विकासाकडे वाटचाल सुरू केली आहे.गावातील २१ कन्यांच्या नावे ठेवपावतीश्री ग्राम विकास मंडळातर्फे जन्माला येणाºया मुलींचं स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. जन्माला येणाºया गावातील प्रत्येक मुलीच्या नावे बॅँकेत पाच हजार रुपयांची ठेवपावती केली जाते. मुलगी एकवीस वर्षांची होताच तिला ही रक्कम मिळते. मंडळाने आतापर्यंत २१ मुलींच्या नावे ठेवपावती केली आहे.शेतकरी ते इंजिनिअर...अनपटवाडी गावातील मुलीच नव्हे तर या गावात लग्न होऊन आलेल्या सुनाही उच्चशिक्षित आहेत. अनेक महिला या मोठ्या पदावर कार्यरत आहेत. शेतीची कामे करण्याबरोबरच येथील अनेक महिला या शिक्षिका, सीए, अभियंता असून वकिलीही करीत आहेत. 

गावाने सुरू केलेले ‘लेक वाचवा लेक वाढवा’ अभियान सर्वांना आदर्शवत असेच आहे. ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविल्या जाणाºया उपक्रमातून लेकी अन् सुनांचाही सन्मान होत आहे.- रेणुका काळे,शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSchoolशाळा