मुलींची छेड अन् मुलांचा राडा!

By Admin | Updated: August 10, 2015 23:59 IST2015-08-10T23:59:43+5:302015-08-10T23:59:43+5:30

प्रवासातील चित्र : युवकांमधील शीघ्रकोपी वृत्ती ठरतेय पोलिसांची डोकेदुखी-महाभारत प्रवासातले...

Girls' Chad And Children's Rada! | मुलींची छेड अन् मुलांचा राडा!

मुलींची छेड अन् मुलांचा राडा!

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मनोमिलनाचा करिष्मा आणखी एकदा स्पष्ट झाला. १९ जागांपैकी सर्वच जागा जिंकत पुन्हा एकदा बाजार समितीत मनोमिलनाचीच सत्ता आली. मनोमिलनाला शह देण्याचे नाराजांचे मनसुबे धुळीला मिळाले. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी रविवारी ९० टक्के मतदान झाले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय सुद्रिक यांच्या उपस्थितीत भूविकास बँकेच्या सभागृहात मतमोजणी झाली. निकाल बाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघाच्या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे नितीन कणसे (१५८२), रमेश चव्हाण (१५९२), चंद्रकांत जाधव (१५९४), विक्रम पवार (१५६३), किरण साबळे (१५९५) यांनी तर खासदार उदयनराजे भोसले गटाचे बाबासो घोरपडे (१५९७), हेमंत सावंत (१५४९) यांनी विजय मिळविला. अनिल साळुंखे यांचा पराभव झाला.ग्रामपंचायत गटामध्ये आमदार गटाचे श्रीरंग देवरुखे (११६४) तर खासदार गटाचे सतीश माने (११३६) व आर्थिक दुर्बलमध्ये अशोक चांगण यांनी विजय मिळविला. अभय पवार, जयवंत मोरे यांचा पराभव झाला.
आडते व व्यापारी गटात आमदार गटाचे सुनील झंवर (७०६), खासदार गटाचे सोमनाथ धुमाळ (६१३) यांनी राहुल घाडगे, राजन चतूर, दिलीप ताटे यांचा पराभव केला.
आमदार गटाचे नानासाहेब गुरव (इतर मागास), रघुनाथ जाधव (भटक्या जमाती), शैलेंद्र आवळे (अनुसूचित जाती-जमाती), अनिल जाधव (हमाल-तोलारी), शालन कदम (महिला राखीव), खासदार गटाचे शंकरराव किर्दत (कृषी प्रक्रिया), अलका पवार (महिल राखीव) यांची या आधीच बिनविरोध निवड झाली होती. विरोधकांना तीन अंकी मतांच्या वर पल्ला गाठता आलेला नाही. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत जल्लोष केला. तसेच शहरात विजयी मिरवणूक काढली. (प्रतिनिधी)


७ उदयनराजे तर १२ जागा शिवेंद्रराजे गटाकडे
सातारा बाजार समितीच्या १९ जागांपैकी १२ जागा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तर सात जागा खासदार उदयनराजे गटाला मिळाल्या आहेत. स्वीकृत सदस्यांमधून खासदार गटाच्या आणखी दोन जागा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विजयानंतर भाऊसाहेब महाराजांना अभिवादन
सातारा बाजार समितीत विजयी झालेल्या सर्व नूतन संचालकांनी दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वेदांतिकाराजे भोसले, पंचायत समितीचे माजी सभापती नारायणराव कणसे, जेष्ठ नेते अ‍ॅड. लालासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, पंचायत समितीचे उपसभापती सुर्यकांत पडवळ, पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे, माजी जि. प. सदस्य सुनिल सावंत, पद्मासिंह फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Girls' Chad And Children's Rada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.