शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला, आईसमोरच नेले फरपटत; गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:27 IST

आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले

कऱ्हाड (जि. सातारा) : घरासमोर आईच्या हाताला धरून चालत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला. चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने तिला सुमारे पन्नास फूट शेतात फरपटत नेले. मात्र, आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. अविरा स्वप्नील सरगडे (वय ३) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.दरम्यान, या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीवर कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कोपर्डे हवेली गावात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली असतानाच मंगळवारी सायंकाळी तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला केला. गावातील अविरा सरगडे ही तीन वर्षांची चिमुकली मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी आपली आई पूजा यांच्याबरोबर घराबाहेर आली. यावेळी चिमुकली आपल्या आईच्या हाताला धरून घरासमोर चालत असताना अचानकपणे मोकाट कुत्र्याने पाठीमागून येऊन तिच्यावर हल्ला केला.कुत्र्याने अविराच्या हाताला, दंडाला चावा घेऊन तिला सुमारे पन्नास फूट फरपटत शेतात नेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अविराची आई पूजा यांनी आरडाओरडा करून कुत्र्याला पळवून लावले. पूजा यांनी ग्रामस्थ व नातेवाइकांच्या मदतीने अविराला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdogकुत्रा