पत्र्यासोबत मुलगीही हवेत उडाली

By Admin | Updated: May 27, 2014 23:11 IST2014-05-27T23:06:03+5:302014-05-27T23:11:44+5:30

नांदलापूरातील घटना : दहा फूटावरून खाली पडल्याने मुलगी गंभीर

The girl also accompanied the letter in the air | पत्र्यासोबत मुलगीही हवेत उडाली

पत्र्यासोबत मुलगीही हवेत उडाली

 मलकापूर : वादळी वार्‍यावेळी खांबाला पकडून उभी राहिलेली मुलगी पत्रा व खांबासह हवेत उडाली. घटनास्थळापासून सुमारे पंचवीस फूट अंतरावर व दहा फूट उंचावर गेल्यानंतर ती खाली पडली. या घटनेत संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली असुन तीच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदलापूर, ता. कºहाड येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. प्रीती विलास पवार (वय १४) असे जखमी मुलीचे नाव आहे. नांदलापूरला मंगळवारी दुपारी वादळी वार्‍याचा मोठा तडाखा बसला. वादळी वारे सुरू असताना गावातील प्रीती पवार ही मुलगी घरातील लाकडी खांबाला धरून उभी राहिली होती. त्याचवेळी अचानक मोठ्या प्रमाणात वार्‍याचा तडाखा बसून पवार यांच्या घरावरील पत्रा खांबांसह उडाला. खांब जमिनीतूनच उपटल्यामुळे खांबाला धरून उभी राहिलेली प्रीती खांबासोबत हवेमध्ये उडाली. घटनास्थळापासून सुमारे पंचवीस फूट अंतरावर गेल्यानंतर दहा फूटावरून ती जमिनीवर कोसळली. त्यामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे तीला उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, वादळी वार्‍यामुळे विलास बाळू पवार, यशवंत शंकर पवार व मधूकर यशवंत पवार यांच्यासह नांदलापूरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. संसारोपयोगी साहित्य भिजल्याने ग्रामस्थांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. पाचवडफाटा येथील प्रताप दिनकर देसाई यांच्या किराणा दुकानाचे छत वार्‍याने उडून गेल्यामुळे साहित्य भिजून दीड लाखाचे नुकसान झाले. मंडलाधिकारी एन. जी. निकम, तलाठी सी. बी. पारवे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)

Web Title: The girl also accompanied the letter in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.