जोडरस्त्यांची कामे तातडीने सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST2021-05-26T04:38:21+5:302021-05-26T04:38:21+5:30
या वेळी गंगाधर जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे शाखा अभियंता निखिल पानसरे, कन्सल्टंट रेसिडीयन इंजिनीअर वाणी, स्ट्रक्चरल इंजिनीअर ...

जोडरस्त्यांची कामे तातडीने सुरू करा!
या वेळी गंगाधर जाधव, राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूरचे शाखा अभियंता निखिल पानसरे, कन्सल्टंट रेसिडीयन इंजिनीअर वाणी, स्ट्रक्चरल इंजिनीअर जावेद आणि प्रोजेक्ट मॅनेजर कुलकर्णी उपस्थित होते.
गुहागर - विजापूर रस्त्यावरील कऱ्हाड येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम बरेच दिवस रखडले होते. मध्यंतरी पावसामुळे काही अडचणी येत असल्याने थोडा उशीर झाला. मात्र, आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा सूचना मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत. शेजारच्या नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक असल्याने दळणवळणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. नवीन पुलाच्या दोन्ही बाजूचे जोडरस्ते, उत्तरेकडील बाजूस कॅनॉलवरील पुलाच्या लेव्हलला व दक्षिणेकडील बाजूस डॉ. एरम हॉस्पिटलच्या समोरील रस्त्याच्या उंचीला रस्ता उचलून घेण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी संबंधितांना दिल्या.