शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वर सर्वसाधारण सभेतच पेपरलेसला ‘खो’-पर्यावरणप्रेमींतून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:30 IST

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो

ठळक मुद्दे३५ ठरावांसाठी १०० पानांचे संच प्रत्येक नगरसेवकाला दिले

महाबळेश्वर : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन पातळीवर प्लास्टिकबंदी, पेपरलेस काम करण्यासाठी जनजागृती केली जाते; पण महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘पेपरलेस’ संकल्पनेलाच खो दिल्याचे दिसून येते. पालिकेच्या सर्व नगरसेवकांना ३५ ठरावांचे शंभर पानी संच दिले आहेत.महाबळेश्वर नगरपरिषद ही ‘क’ वर्गातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका आहे. या पालिकेत मुख्याधिकारी, लोकनियुक्त सतरा व दोन स्वीकृत असे १९ नगरसेवक शहराच्या कारभार नियोजनासाठी आहेत. प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी १९ नगरसेवकांना सर्वसाधारण सभेत होणाऱ्या विषयांचा संच व त्यासोबत मुख्याधिकारी यांचा अभिप्राय असा संच त्यांना पाठविण्यात येतो. त्याचबरोबर हा संच त्यांना त्यांच्या कार्यालयात, घरी किंवा त्यांच्या अभ्यासासाठी देण्यात येतो.त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या दिवशी प्रत्यक्ष पालिकेच्या सभागृहात असाच संच प्रत्येकाला सभागृहात चर्चेसाठी देण्यात येतो. दरवेळी सुमारे १० ते १५ पानांमध्ये सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचा संच असतो; परंतु नवीन आराखड्यानुसार नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ३५ विषयांसाठी सुमारे शंभर पानांचा संच प्रत्येक नगरसेवकाला देण्यात आला.वास्तविक प्रत्येक नगरसेवकाला सर्वसाधारण सभेचा अजेंडा व अभिप्रायाचे दोन संच, मुख्याधिकारी यांच्याकडे एक संच असे एकूण २० जणांसाठी प्रत्येकी शंभर याप्रमाणे किमान दोन हजार पानांचा किमान वापर एका सर्वसाधारण सभेत होत आहे.त्याचबरोबर सभेत झालेल्या निर्णय प्रक्रियेसाठी ठराव करताना वापरण्यात येणारी पाने असे प्रत्येक सर्वसाधारण सभेत किमान दहा हजार पानांचा वापर होत आहे. संपूर्ण जगात झाडे वाचविण्याच्या उद्देशाने पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे. येथे मात्र कागद व शाईचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे येथील पर्यावरणाचे एक प्रकारे नुकसानच होत आहे.सोळा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमधून सुरुवातीला पालिकेचे अनावश्यक खर्च वाचविण्यासाठी चांगले निर्णय राबविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्यामध्ये मुख्यत्वे सर्वसाधारण सभेमध्ये व पालिकेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या हद्दपार करण्याचा महत्त्वाचा निर्णयाचे कौतुक शहरातून झाले होते. शहरातील स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न पालिकेने केले आहेत. ही दोन्ही कामे शहरातून चर्चेचे विषय ठरले आहेत. परंतु पालिकेतील अनावश्यक कागदांच्या वापरावरही निश्चित धोरण ठरवून निर्णय घेणे आवश्यक आहे.एकीकडे सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये पेपरलेस करण्याचा शासनाचे धोरण असताना दुसरीकडे मात्र, पेपरचाच वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पेपरसाठी होणारा आवाढव्य खर्च पालिका प्रशासनाने टाळणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.डिजिटलचा पर्याय आवश्यकसध्या स्मार्टफोनचा वापर हा सतत होताना दिसतो. डिजिटल युगामध्ये आजच्या मितीला कागदाऐवजी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सभागृहात प्रोजेक्टरच्या माध्यमातून देखील चर्चा करणे सोयीचे आहे. स्मार्टफोनवर प्रत्येकाला फाईल उपलब्ध करून दिल्यास तो नगरसेवकांना व इतरांनाही सोयीचा पर्याय होऊ शकते. यामुळे पालिकेच्या स्टेशनरीच्या खर्चात मोठी बचत करता येऊ शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण