जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गौरी शिंदे, सानवी शिंदे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:37+5:302021-08-15T04:39:37+5:30
कुडाळ: जावळी तालुक्यातील जवळवाडी या उपक्रमशील ग्रामपंचायतीच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर ...

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गौरी शिंदे, सानवी शिंदे प्रथम
कुडाळ: जावळी तालुक्यातील जवळवाडी या उपक्रमशील ग्रामपंचायतीच्यावतीने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. मोठ्या गटात शिरवळची गौरी गंगाधर शिंदे तर लहान गटात सोनगाव, ता. सातारा येथील सानवी सूरज शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जवळवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने युवक-युवतींच्या विचारांना चालना मिळावी, याकरिता सातारा जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान व मोठ्या गटासाठी असणाऱ्या या स्पर्धेसाठी दहा विषय देण्यात आले होते. जिल्ह्यातील ९२ स्पर्धक यामध्ये सहभाग घेतला होता.
स्पर्धेसाठी व्याख्याते सागर पवार,जगन्नाथ शिंदे, उमेश सूर्यवंशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत मोठ्या गटात कुमारी गौरी शिंदे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक श्वेता कारंडे सातारा, तृतीय क्रमांक ध्रुव पटवर्धन सातारा, उत्तेजनार्थ प्रथम भाविका आर्डे म्हसवे, उत्तेजनार्थ द्वितीय श्वेता कुंभार कण्हेर, लोकप्रिय वक्ता प्रथम क्रमांक वैष्णवी भोसले डिस्कळ, ता. खटाव, द्वितीय क्रमांक चंदना देशमुख डिस्कळ, ता. खटाव, लहान गटात प्रथम क्रमांक सानवी शिंदे सोनगाव, ता. सातारा द्वितीय क्रमांक आदिती चोरट आसगाव, ता. सातारा, तृतीय क्रमांक श्रावणी गोळे भोगवली, ता. जावळी, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राची सपकाळ म्हाते, ता. जावळी, उत्तेजनार्थ द्वितीय संस्कृती मोरे महिगाव, ता. जावळी, लोकप्रिय वक्ता प्रथम क्रमांक मनस्वी देशमुख बिभवी, ता. जावळी, द्वितीय क्रमांक इंद्रनील पोळ, जवळवाडी ता. जावळी या स्पर्धकांनी विजय मिळविला आहे.