उंडाळे येथे अठरा फेब्रुवारीला स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:48+5:302021-02-13T04:37:48+5:30
कराड:- थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त १८ फेब्रुवारीस स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा होणार असल्याची ...

उंडाळे येथे अठरा फेब्रुवारीला स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा
कराड:-
थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त १८ फेब्रुवारीस स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा होणार असल्याची माहिती दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त, जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांनी दिली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा.धनाजीराव काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील म्हणाले, दिवंगत विलासराव पाटील यांच्या संकल्पनेतून उंडाळे येथे गेली ४५ वर्षे प्रबोधनाचे काम सुरू आहे.
दादा उंडाळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रवर्तक माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांचे मागील महिन्यात निधन झाले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ३८ वे स्वातंत्र्य संग्राम अधिवेशन, माजी सैनिक मेळावा व सन्मानिका प्रकाशन करण्यात येणार आहे.
माजी प्राचार्य गणपतराव कणसे म्हणाले,उंडाळे (ता. कराड) येथे या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्य ॲड उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहे. या वर्षी होणाऱ्या या कार्यक्रमास प्रबोधन प्रकाशन इचलकरंजीचे संपादक प्रसाद कुलकर्णी व पत्रकार संजय आवटे हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास यापूर्वी दिवंगत विलासराव पाटील यांच्या प्रयत्नातून देशातील महान विभूती येऊन आपले विचार व्यक्त केले आहेत. सदर कार्यक्रमास राज्यातील माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांना निमंत्रित केले असून ग्रामस्थ व विभागातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. उदयसिंह पाटील यांनी केले आहे.
फोटो--दादा उंडाळकर