शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मारूल तर्फ पाटणमध्ये गेस्ट्रोमुळे हाहाकार, बालिकेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:54 IST

Health Satara karad- कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथे नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. यामध्ये पाच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी अंत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. गावातील सुमारे ८५ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्यावर घरामध्ये आणि उपकेंद्रात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे मारूल तर्फ पाटणमध्ये गेस्ट्रोमुळे हाहाकार, बालिकेचा बळी ८५ ग्रामस्थांना उलट्या, जुलाबाचा त्रास; आरोग्य विभाग सतर्क

पाटण : कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथे नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. यामध्ये पाच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी अंत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. गावातील सुमारे ८५ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्यावर घरामध्ये आणि उपकेंद्रात उपचार सुरू आहेत.दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दोन दिवसांपासून ठिय्या मांडून आहे. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, आरोग्य अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांनी गावाला भेट देवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.पाटण तालुक्यातील मारूल तर्फ पाटण येथे गत दोन दिवसांपासून ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागला. याबाबतची महिती ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ गावाला भेट देवून पाहणी केल्यावर दुषित पाण्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बबनराव कांबळे यांनी तातडीने गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याशी संपर्क साधून आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. उपकेंद्रात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना उपकेंद्रात आणि घरामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान, शनिवारी शेळके वस्तीजवळील सुतार वस्तीमधील जान्हवी लोहार या पाच वर्षाच्या बालिकेला उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागल्याने तिला पाटण येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी तिला कऱ्हाडात पुढील उपचारार्थ नेण्यास सांगितले होते. मात्र कुटुंबियांनी तिला परत गावाला नेले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जान्हवीला उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागल्याने तिला कऱ्हाडला नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.गटविकास अधिकारी मीना साळुंखे व तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुप्रिम कांबळे, प्रफुल्लकांत कांबळे, आरोग्य सहाय्यक जी. एस. धुमाळ, आरोग्य सेवक सुभाष धामोडे, ताहीर डांगे, अनिरूध्द कोरडे, आरोग्य सेविका पार्वती माने, प्रतिक्षा पेंढारी, मुसा चाफेरकर, आरोग्य विस्तार अधिकारी टी. बी. पाटील हे पथक गावात तळ ठोकून आहे.पाईपलाईनला गळती लागल्याचे स्पष्टमारूल तर्फ पाटण गावात घरोघरी जावून अंगणवाडी सेविका व आशांमार्फत सर्वे करण्याचे काम सुरू आहे. गावात साथ का उद्भवली याची शहानिशा करण्यासाठी पाटण येथील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपअभियंता एस. आर. कदम व शाखा अभियंता एम. बी. पाटील यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेची तपासणी केली. यात पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSatara areaसातारा परिसरKaradकराडhospitalहॉस्पिटल