लोणंद बाजारात गरवा कांदा १६००, तर लालकांदा १७०० रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:02+5:302021-09-03T04:41:02+5:30

लोणंद : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवार, दि. २ रोजी झालेल्या कांदा बाजारात गरवा ६९२ पिशवी, ...

Garva onion is Rs 1,600 per quintal and red onion is Rs 1,700 per quintal in Lonand market | लोणंद बाजारात गरवा कांदा १६००, तर लालकांदा १७०० रुपये क्विंटल

लोणंद बाजारात गरवा कांदा १६००, तर लालकांदा १७०० रुपये क्विंटल

लोणंद : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवार, दि. २ रोजी झालेल्या कांदा बाजारात गरवा ६९२ पिशवी, तर लाल कांद्याची १७०० पिशवी आवक झाली आहे,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.

गरवा कांदा नंबर एक १३०० ते १६०० रुपये, कांदा नं. दोन १०५० ते १३००, गरवा कांदा गोल्टी ६०० ते १०५० रुपये दर निघाले, तर लाल कांदा नंबर एक १३०० ते १७०० रुपये, कांदा नं. दोन १००० ते १३००, गरवा कांदा गोल्टी ७०० ते १००० रु. दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.

जनावरे बाजारात म्हैस ४०,००० ते ७०,००० (आवक १० नग) गाय ५५,००० ते ६५,००० (आवक ६० नग), शेळ्या ४२०० ते १६,००० (आवक १७०० नग), मेंढ्या ६००० ते १७००० (आवक २१०० नग), बोकड ५००० ते २५,००० रुपये (आवक ६०० नग) अशाप्रकारचे बाजारभाव लोणंद बाजारात पाहावयास मिळाले.

Web Title: Garva onion is Rs 1,600 per quintal and red onion is Rs 1,700 per quintal in Lonand market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.