‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ क्रांती घडवेल

By Admin | Updated: August 9, 2016 23:52 IST2016-08-09T23:43:57+5:302016-08-09T23:52:41+5:30

रामराजे नाईक-निंबाळकर : खंडाळ्यात पंचायत समितीच्या शैक्षणिक उपक्रमास प्रारंभ

'Garudzep Savitri Khandala' will revolutionize the revolution | ‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ क्रांती घडवेल

‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ क्रांती घडवेल

खंडाळा : ‘संस्कारक्षम वय असलेली भावी पिढी गुरुजनांच्या हाती आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार घडविण्याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अध्ययनाची क्षमता वाढविण्यासाठी शिक्षणाच्या नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे.
खंडाळा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प गरुडझेप घेईल, असा विश्वास व्यक्त करीत योग्य परिवर्तन घडल्यास या ‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ या प्रकल्पातून राज्याला नवे धोरण देऊ,’ असे मत राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.खंडाळा पंचायत समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा ‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याचा’ हा नवा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला. त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, उपजिल्हाधिकारी वाघमारे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, सदस्य रमेश धायगुडे, दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, अनिता शेळके, दीपा बापट आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार कमरंद पाटील म्हणाले, ‘खंडाळा तालुक्याने क्रांतीदिनाच्या निमित्ताने क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. एक वैचारिक तालुका म्हणून खंडाळ्याकडे पाहिले जाते. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू होणारा प्रकल्प राज्यात नावलौकिक घडवेल. विद्यार्थ्यांना सर्वांगीण गुणांचा विकास करण्यासाठी या उपक्रमातून क्रांती घडेल.’
या कार्यक्रमाच्या वेळी या नवीन प्रकल्पाला दिशादर्शक करणाऱ्या ‘मार्गदर्शक पुस्तिकेचे’ प्रकाशन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथकाने लहन मुलांचा कला कौशल्याचे अनोखे दर्शन घडविले. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Garudzep Savitri Khandala' will revolutionize the revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.