रस्त्याकडेला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:43+5:302021-02-05T09:18:43+5:30
साइडपट्ट्या खचल्या मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावरून ये-जा ...

रस्त्याकडेला कचरा
साइडपट्ट्या खचल्या
मेढा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील साइडपट्ट्या खचल्या असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनू लागला आहे. अनेकदा येथे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त दिसत नसल्यामुळे मदत मिळत नाही.
संरक्षक जाळी गायब
शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी, पादचारी, जनावरे अचानक महामार्गांवर येऊ नये म्हणून संरक्षक जाळी बसविली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होते. मात्र, शिरवळसह अनेक भागात महामार्गाच्या कडेलाच वडापाव, चहाची हॉटेल्स आहेत. या हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक यावेत यासाठी परस्पर संरक्षक जाळी काढली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
गव्यांचे दर्शन
पेट्री : कास पठार ते महाबळेश्वर या राजमार्गावर गव्यांचे वारंवार दर्शन होत आहे. या रस्त्यावरून वर्दळ वाढली असल्याने काहीवेळा दुचाकीचालक आणि गव्यांचा कळप आमने-सामने येत असून, गव्यांच्या संवर्धनासाठी या भागात तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.
कारवाईची मागणी
सातारा : दुचाकी वाहनांच्या नंबरप्लेटवर क्रमांकाबरोबरच काव्यपंती, चारोळ्या, भाई, दादा यासह विविध नावे लिहिण्याचे प्रमाण आजही कायम आहेत. याद्वारे कधी कधी आपल्या प्रेमाचा तर कधी जीवनाचा तर कधी आपण किती मौल्यवान आहोत याचा देखावा काव्यपंक्तीच्या सादरीकरणातून केला जात आहे.
अतिक्रमणे वाढली
सातारा : साईबाबा मंदिर, गोडोली नाका रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करावी, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.
धोका वाढला
सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस वाहतूक वाहने धावू लागली आहेत; पण अनेकवेळा ही वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यासाठी सर्वच तालुक्यात ऊस वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.