शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:20 IST

environment Satara-शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.

ठळक मुद्देशिरवळमध्ये तीन महिन्यांपासून पेटतोय कचरा, पर्यावरणाची हानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ हे महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना बसला असून कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ग्रामपंचायतीतर्फे शिरवळचा कचरा सटवाई कॉलनी व फुलमळ्यालगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. कचऱ्याला अचानकपणे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होतो.ग्रामपंचायतीने येइील कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा या मागणीचा ठराव ग्रामसभा व विविध मार्गे ग्रामपंचायत सदस्यांसहित रहिवाश्यांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे अनेकदा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. कचरा डेपो तीन महिन्यांपासून धुमसत असतानाही शिरवळ ग्रामपंचायतीकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाश्यांनी केला आहे.फुलमळ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये शिरवळ ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. येथील विहिरीसह बंधारा व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणGarbage Disposal Issueकचरा प्रश्नSatara areaसातारा परिसर