शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

By दीपक शिंदे | Updated: March 13, 2023 17:26 IST

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान

कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने कृष्णाकाठावर धुमाकूळ घातला असून बेलवडेतील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. कित्येक मीटर लांबीच्या वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.कृष्णा नदीकाठावर असलेल्या वीज पंपांची वायर चोरून नेण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. बेलवडे हवेली येथे गत पाच दिवसांत चोरट्यांनी नदीकाठच्या तब्बल वीसहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल रात्री कापून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेलवडे हवेली गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीतूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना करून शेतीसाठी पाणी नेले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा विद्युत पंप नदीवर आहे. प्रत्येक वर्षी नदीला पूर येत असल्यामुळे नदीपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर प्रत्येकाने विद्युत पेटी बसवली आहे. त्या विद्युत पेटीपासून नदीपर्यंत केबल टाकत पंपाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज केबलमध्ये तांबे धातू असतो. आणि त्या धातूला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.वीज पंपाच्या केबल चोरीस गेल्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार होणाऱ्या चोरीमुळे मोठे नुकसान होत आहे. तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, ऐन उन्हाळ्यातच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीबरोबरच विद्युत पंप बंद राहत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाया जाण्याचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसानबेलवडे हवेलीत गत काही दिवसांपासून केबल कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच रात्री दहा ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जोडलेल्या केबल रात्रीच्या वेळी कापून चोरून नेण्यात आल्या आहेत. नारायण पवार, माजी सभापती दाजी पवार, संग्राम पवार, दत्तात्रय पवार, अंकुश पवार, मारुती पवार, विजयसिंह पाटील, रमेश पाटील, संग्राम पवार यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीelectricityवीजtheftचोरी