शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मोबाइल चोरणारी टोळी गजाआड, झारखंडच्या चौघांसह पाच जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:41 IST

भाजी मंडईतील चोरीचे १२ मोबाइल हस्तगत

सातारा : शहरात भाजी मंडईमध्ये नागरिकांचे मोबाइल हातोहात चोरणाऱ्या झारखंडच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे १२ मोबाइलपोलिसांनी हस्तगत केले.जगदीश रामप्रसाद महतो (वय ३२), अजित कुमार सुरेश मंडल (२४), रोहित कुमार सियाराम महतो (२५), अर्जुन राजेश मंडल (२०, सर्व रा. महाराजपूर, जि. सहाबगंज, झारझंड), शोयेब मस्तानसाहब शेख (२४, रा. सलगरापुरा, ता. मुखेड, नांदेड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.सातारा शहरातील भाजी मंडईमध्ये एकाच दिवशी पाच ते सहा जणांचे मोबाइल चोरीस गेले होते. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांचे एक पथक राधिका सिग्नल भाजी मंडईजवळ मंगळवारी वाॅच ठेवून होते. त्यावेळी पोलिसांना एक संशयित कार दिसली. त्या कारला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने कारचा पाठलाग करून वाढेफाटा येथे ती कार थांबविली. सर्व संशयितांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ महागडे १२ मोबाइल आढळून आले. हे सर्व मोबाइल त्यांनी साताऱ्यातील भाजी मंडईमधून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आराेपींकडून कारसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोबाइल चोरीचे त्यांच्याकडून एकूण सात गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, जोतीराम पवार, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, जयवंत घोरपडे, महिला पोलिस कोमल पवार आदींनी या कारवाईत भाग घेतला.नागरिकांमधून समाधान..भाजी खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांचे अचानक मोबाइल चोरीस गेल्याने नागरिक हतबल झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने मोबाइल चोरणारी टोळी पकडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.