शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाचगणीत अमली पदार्थ तस्करांची टोळी जेरबंद; कोकेनसह ४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सर्व आरोपी मुंबईतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:57 IST

सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यातील गुन्हेगार कारवाया करत असल्याचे समोर आले

पाचगणी : पाचगणी जवळील घाटजाई मंदिराजवळ कोकेन सदृश अमली पदार्थ विकणारी १० जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा व पाचगणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी कोकेन सदृश अमली पदार्थ, दोन कार व मोबाईल असा एकूण ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री पाचगणी पोलिसांना घाटजाई मंदिराजवळ कोकेन सदृश अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचला. रात्री १२.०५ च्या सुमारास विस्टा ग्रँड सोसायटीमधील ‘इस्टेला-१ ए’ बंगल्याजवळील पार्किंगमध्ये छापा टाकण्यात आला. तेथे दोन अलिशान कार (एमएच ०२ डी.एन.०२५९) व (एमएच ०१ डी.के. ८८०२) उभ्या होत्या. या दोन्ही कारमध्ये महंमद नावेद सलिम परमार (वय ३२), सोहेल हशद खान (वय ३५), महंमद ओएस रिजवान अन्सारी (वय ३२), चासिल हमीद खान (वय ३१), महंमद साहिल अन्सारी (वय ३०), जिशान इरफान शेख (वय ३१), सैफ अली कुरेशी (वय २१), महंमद उबेद सिद्धीकी (वय २७), अली अजगर सादिक राजकोटवाला (वय ३०), राहिद मुख्तार शेख (वय ३१) सर्व रा. मुंबई. हे दहाजण आढळून आले.

पाच लाखाचे कोकेन जप्त...पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ ५ लाखांचे कोकेन सदृश अमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाइल हँडसेट असा मुद्देमाल आढळून आला. त्यांची चौकशी केली असता अमली पदार्थ पाचगणी शहरात विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपींनी कबूल केले. या प्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक परितोष दातीर तपास करीत आहेत.

सर्व आरोपी मुंबईतीलपाेलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे मुंबई येथे वेगवेगळ्या भागात राहत आहेत. कारवाईनंतर सातारा जिल्ह्यात परजिल्ह्यातील गुन्हेगार कारवाया करत असल्याचे समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Drug traffickers arrested in Panchgani; ₹42 lakh worth seized.

Web Summary : Police arrested ten drug traffickers near Panchgani, seizing ₹42.85 lakh worth of cocaine, cars, and phones. The suspects, all from Mumbai, confessed to intending to sell the drugs in Panchgani. An investigation is underway.