केबल चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:33+5:302021-01-08T06:04:33+5:30

तारळे विभागातील नुणे येथेही काही दिवसांपूर्वी वायर चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे या भागात वायर चोरणारी टोळी सक्रिय असण्याची ...

A gang of cable thieves | केबल चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

केबल चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ

तारळे विभागातील नुणे येथेही काही दिवसांपूर्वी वायर चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे या भागात वायर चोरणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तारळे परिसरात काही वर्षांपूर्वी विद्युत मोटारी व वायर चोरण्याच्या घटना घडत होत्या. पोलीस कारवाईमुळे अशा घटना जवळपास बंद झाल्या. मात्र आता वायर चोरी करणारी टोळी पुन्हा डोके वर काढत असल्याचे समोर आले आहे. सलग सहा ते सात मोटारी असताना फक्त मोठ्या वायरवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. बारमाही वाहणाऱ्या तारळी नदीवर शेकडो शेतकऱ्यांनी शेतीपंप बसविले आहेत. तारळी नदीच्या पुलाजवळ शेतकऱ्यांच्या सहा मोटारी आहेत. यातच संजय जाधव व अन्य शेतकऱ्यांनी सामाईक मोटर बसवलेली आहे. दोन दिवसांपूर्वी सकाळी संजय जाधव हे वीज असल्याने मोटर सुरू करण्यास गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी वायर चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वायर चोरीच्या या घटनांमुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: A gang of cable thieves