गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : खोबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:49+5:302021-09-03T04:40:49+5:30
कोपर्डे हवेली : ‘देव हा श्रध्देचा आणि आस्थेचा विषय आहे. प्रत्येकवर्षी सण येत असतात. माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. गेलेला ...

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : खोबरे
कोपर्डे हवेली : ‘देव हा श्रध्देचा आणि आस्थेचा विषय आहे. प्रत्येकवर्षी सण येत असतात. माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. गेलेला जीव परत येणार नाही. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा,’ असे प्रतिपादन कऱ्हाड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी केले.
कोपर्डे हवेली येथील गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, सहायक फौजदार राजू महाडिक, प्रशांत ताळरेकर, लावंड, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, सुनील सरगडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव लाटे, सिध्दार्थ चव्हाण, शैलेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, भरत चव्हाण, उत्तम चव्हाण, अर्जुन चव्हाण, संदीप चव्हाण उपस्थित होते.
खोबरे म्हणाले, ‘चार फुटांच्यावर गणपती मूर्ती बसवू नये, रस्त्यावर मंडळांनी स्टेज घालू नये, पाचहून अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, गावात एकच गणपती बसविण्याचा विचार करावा, जमा झालेल्या वर्गणीतून गावात सीसीटीव्ही बसवले, तर गावात गैरप्रकार बसण्यास आळा बसेल, शासनाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नेताजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव लाटे यांनी आभार मानले.
फोटो ०२कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली येथील गणपती मंडळाच्या बैठकीत ए. टी. खोबरे यांचे भाषण झाले.