खटाव तालुक्यात गणेशोत्सवाची चाहुल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:40 IST2021-09-03T04:40:54+5:302021-09-03T04:40:54+5:30
खटाव : अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची आता चाहुल लागली आहे. मूर्तिकार आता गणेशाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात ...

खटाव तालुक्यात गणेशोत्सवाची चाहुल!
खटाव : अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची आता चाहुल लागली आहे. मूर्तिकार आता गणेशाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात व्यस्त झाले आहेत.
गेल्यावर्षीपासून कोरोनाचे संकट आले आहे. सण, उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करत कोठेही या नियमांचे उल्लंघन न करता हा उत्सव याहीवर्षी त्याच पार्श्वभूमीवर साजरा करण्याचे प्रशासकीय अधिकारी सांगत असल्यामुळे मूर्तिकारदेखील एक पाऊल मागेच आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा हा सण गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर नक्कीच पाणी फिरवणार आहे. मंडळांचे मोठे गणपती नसल्यामुळे घरगुती लहान मूर्ती बनविण्याची लगबग आता सुरू आहे.
कोरोनामुळे यावर्षीही गणेशोत्सव साजरा करताना नियम व अटींचे पालन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. घरगुती गणेशमूर्तीला मागणी असल्यामुळे आता ग्राहकाच्या पसंतीनुसार मूर्ती तयार करण्यासह त्यांचे फिनिशिंग करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तीमध्ये दरवर्षी काहीना काही वेगळेपण ठेवण्याची मागणी ग्राहकांकडून होत असते. चालूवर्षी फेट्याची क्रेझ आली असून, गणपतीच्या डोक्यावर मुकुटाऐवजी विविधरंगी फेटे शोभून दिसत आहेत.
०२ खटाव
खटावच्या कुंभारवाड्यात गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवताना मूर्तिकार.