नांदगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST2021-09-02T05:23:27+5:302021-09-02T05:23:27+5:30

कराड : नांदगाव (ता. कराड) येथील ग्रामसभा सोमवार (दि. ३०) रोजी गोंधळात पार पडली. सभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश ...

Ganesh Patil as Nandgaon's anti-dispute president | नांदगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील

नांदगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश पाटील

कराड : नांदगाव (ता. कराड) येथील ग्रामसभा सोमवार (दि. ३०) रोजी गोंधळात पार पडली. सभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश पाटील तर उपाध्यक्षपदी जयवंत मोहिते यांची बहुमताने निवड करण्यात आली. विरोधी उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

कोरोना महामारीमुळे नांदगावची लांबलेली पहिली ग्रामसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये तंटामुक्तीसह अन्य समितींच्या निवडी होणार असल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ११.३० वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी ३.३० पर्यंत चालली. पण ग्रामस्थ ठिय्या मांडून बसले होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच हंबीर पाटील होते. मात्र तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीवरून तणावपूर्ण वातावरण झाल्यानंतर त्यांनी मधूनच हे अध्यक्षपद सोडले. उपसरपंच अधिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र डांगे यांच्या उपस्थितीत सभा पुढे सुरू राहिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, अमोल कांबळे, डॉ. शुभांगी माळी, अनिता पाटील, गौरी मोरे, ग्रामसेवक मोहन शेळके यांची उपस्थिती होती. सभेमध्ये बहुमताने हात वर करून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यात आले.

निवडीनंतर ज्येष्ठ नेते वि. तु. सुकरे-गुरुजी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते पोपटराव पाटील, सतीश कडोले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, डॉ. नरेंद्र माळी, हितेश सुर्वे, दत्तात्रय माटेकर, सागर कुंभार, विजय पाटील, जगन्नाथ पाटील, शिवाजी माळी, अरविंद पाटील, अधिकराव पाटील, विलास माटेकर, सयाजी शिंदे, अशोक शिंदे, संग्राम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या निवडी यशस्वी करण्यासाठी युवा नेते पोपट पाटील, खरेदी-विक्री संघाचे संचालक टी. के. पाटील, श्यामराव पाटील पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ माळी, दिनकरराव पाटील, विजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

फोटो

नांदगाव, ता. कराड येथे तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थ

फोटो

गणेश पाटील

जयवंत मोहिते

Web Title: Ganesh Patil as Nandgaon's anti-dispute president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.