शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये बाप्पांना निरोप !, मंडळांत रंगली आवाजाची स्पर्धा 

By दीपक शिंदे | Updated: September 18, 2024 18:29 IST

तब्बल १६ तास रंगला विसर्जन सोहळा

सातारा : साताऱ्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंगळवारी लाडक्या गणरायाला भक्तिपूर्ण निरोप देण्यात आला; परंतु यंदाच्या उत्सवात बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा खंडित करून डीजेच्या दणक्यात मिरवणुका काढल्या. नियम डावलून, आवाज वाढवून, लेझर लाईटच्या झगमगाटात काढण्यात आलेल्या या मिरवणुकांनी सर्वसामान्यांच्या अक्षरश: कानठळ्या बसल्या. सकाळी ९:४० वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर बाप्पांचा विसर्जन सोहळा शांत झाला.गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यापासून घरोघरी उत्साहात उधाण आले होते. बाप्पांची दहा दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर अनंत चतुर्दशी दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. सातारा शहरातील जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा, कल्याणी शाळा व बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्यात सकाळपासूनच भाविकांची मूर्ती विसर्जनासाठी रेलचेल सुरू झाली. शहरातील काही मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या; मात्र सायंकाळी सहानंतर मिरवणुकांना प्रारंभ झाला.यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत बोटावर मोजण्याइतक्या मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा जपली. तर बहुतांश मंडळांनी सर्व नियम डावलून डीजेच्या दणक्यात विसर्जन मिरवणुका काढल्या. लेझर लाईटला बंदी असतानाही मिरवणुकांमध्ये लेझरचा झगमगाट पाहायला मिळाला. काही मंडळांमध्ये तर आवाज वाढविण्याची स्पर्धादेखील दिसून आली. डीजेवरील रिमिक्स गाण्यावर तरुणाई बेभान होऊन थिरकताना दिसून आली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री १२ वाजता हा दणदणाट शांत झाला.साताऱ्यातील मानाचा समजल्या जाणाऱ्या शंकर-पार्वती गणेशाचे बुधवारी सकाळी ९:४० वाजता विसर्जन झाले. यानंतर मिरवणुकीचा शेवट झाला. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सकाळी ९:३० असा एकूण सुमारे १६ तास साताऱ्याचा विसर्जन सोहळा रंगला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विसर्जन मार्ग व तळ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शिवाय ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात होता. त्यामुळे मिरवणूक सोहळा निर्विघ्न पार पडला.

वाई येथे दोन स्वतंत्र मिरवणुका निघाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाई : वाई शहरासह तालुक्यातील कोणत्याही गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये, असे पोलिस प्रशासनाने लेखी आदेश काढूनही आदेशाची अंमलबजावणी न करता सर्रास मंडाळांनी डॉल्बीचा वापर केल्याचे चित्र दुर्दैवाने दिसून आले. प्रचंड आवाजात वाईत यावर्षी मिरवणुका निघाल्या. वाई पोलिस प्रशासनाची मंडळांवर कारवाईची जबाबदारी वाढली आहे. किती मंडळांवर कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे. शहरातून दोन स्वतंत्र मिरवणुका निघाल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. चोख बंदोबस्त ठेवल्याने मिरवणूक शांततेत पार पडली. पालिकेने राबविलेल्या मूर्तीदान योजनेला थंड प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४