फलटणमध्ये खड्ड्यात वृक्षारोपण करून ‘गांधीगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:30+5:302021-09-13T04:38:30+5:30

फलटण : फलटण नगरपालिका रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत नसल्याने फलटण शहर भाजपच्या वतीने फलटण शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून ...

'Gandhigiri' by planting trees in a pit in Phaltan | फलटणमध्ये खड्ड्यात वृक्षारोपण करून ‘गांधीगिरी’

फलटणमध्ये खड्ड्यात वृक्षारोपण करून ‘गांधीगिरी’

फलटण : फलटण नगरपालिका रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत नसल्याने फलटण शहर भाजपच्या वतीने फलटण शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले.

या अनोख्या आंदोलनाविषयी बोलताना नगरसेवक अनुप शहा म्हणाले, ‘शहरातील सर्व रस्ते भुयारी गटर योजनेमुळे खराब झाले असून, ७२ कोटींची असलेली ही भुयारी गटार योजना बेकायदेशीरपणे ११८ कोटींवर नेऊन शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे होत नाहीत हे दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांचे हे अपयश आहे.

यावेळी नगरसेवक अनुप शहा, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरपालिकेतील भाजप गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, ‘आहद’ संस्थेचे अध्यक्ष मेहबूब मेटकरी, रियाझभाई इनामदार, राहुल शहा, मितेश खराडे, नीलेश चिंचकर, डॉ. सुभाष गुळवे, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जगताप यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो १२फलटण-रोड

फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, डॉ. सुभाष गुळवे, अमोल सस्ते, मेहबूबभाई मेटकरी उपस्थित होते. (छाया : नसीर शिकलगार)

Web Title: 'Gandhigiri' by planting trees in a pit in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.