शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गणपती बाप्पा मोरया’...चा जयघोष करत सातारकरांनी भावूक वातावरणात सात दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांना निरोप देत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची साद घातली.पंचांगात यंदा तिथी वृद्धी झाल्यामुळे बाप्पांचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला होता. त्यामुळे पाच दिवसांचा बाप्पांचा मुक्काम यंदा सात दिवसांवर गेल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सात दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गणपती बाप्पा मोरया’...चा जयघोष करत सातारकरांनी भावूक वातावरणात सात दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांना निरोप देत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची साद घातली.पंचांगात यंदा तिथी वृद्धी झाल्यामुळे बाप्पांचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला होता. त्यामुळे पाच दिवसांचा बाप्पांचा मुक्काम यंदा सात दिवसांवर गेल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सात दिवस बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर घरगुती बाप्पांचे विसर्जन शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले. साताºयात सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या होत्या. गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी लहान-थोरांचा असलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.सातारा पालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी मूर्तीदान, निर्माल्य कलश आणि कृत्रिम तळ्याची सोय करण्यात आली होती. यंदा कोणीही घरगुती गणपतींचे विसर्जन मोती तळ्यात केले नाही. पालिकेच्या पोहण्याच्या तलावात हजारो गणपतींचे विसर्जन करण्यात आले. मंगळवार तळे परिसरातही पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी छोटे हौद ठेवण्यात आले होते. पालिक ा कर्मचाºयांनी निर्माल्य तळ्यात टाकण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी हे निर्माल्य कलशात टाकले.घरातील व्यक्त ींबरोबरचं शेजाºयांसह रस्त्यावरून चालत जाऊन अनेकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’...च्या निनादात बाप्पांना विसर्जनाच्या ठिकाणी नेले. विशेष म्हणजे घरगुती गणपती विसर्जनासाठी उत्साही भक्तांनी वाजंत्री, आणि सजवलेली गाडीही आणली होती. सजवलेल्या गाडीतून काढण्यात आलेली बाप्पांची मिरवणूक सर्वांना आकर्षित करत होती. विसर्जनस्थळावर आरती करून बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी परस्परांना खिरापत वाटून आनंद द्विगुणीत करण्यात आला.प्रतापसिंह फार्म परिसरात गर्दीसातारा पालिकेच्यावतीने येथील राधिका रोडवरील प्रतापसिंह फार्म परिसरात कृत्रिम तळे खोदले आहे. उत्सवाच्या सातव्या दिवशी घरगुती गणपतींचे विसर्जन या तळ्यात करण्यात आले.यावेळी येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तळ्याच्या काठावर उभे असलेल्या नागरिकांना सूचना करत पालिका अधिकारी कर्मचारी व पोलिस येथे ठाण मांडून बसले होते. या तळ्यात हजाराहून अधिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.मेढ्यात डॉल्बीविरहीत मिरवणूक‘गणपती बाप्पा मोरया’... ‘पुढच्यावर्षी लवकर या’च्या गजरात जावळी तालुक्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वेण्णा नदीच्या तीरावर घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बी विरहीत मिरवणूक काढली.मेढा, केळघर, कुडाळसह तालुक्यांत अनेक ठिकाणी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मेढा येथे प्रशासनातर्फे कृत्रिम तळे तयार करण्यात आले होते. त्यामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नागरिकांनीही या मोहिमेला प्रतिसाद दिला. यावेळी शेकडो भक्तगण उपस्थित होते.सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जनकºहाड : 'गणपती बाप्पा मोरया,’ ‘पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करीत ढोलताशांच्या गजरात गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. येथील कृष्णा-कोयना नदीकाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घरगुतीसह विविध संस्था, शाळांमधील सुमारे दहा हजार गणशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर दोन हजारांंहून अधिक मूर्ती जलकुंभात सोडण्यात आल्या.येथील कृष्णाबाई घाटावर गणेशमूर्ती विसर्जनास प्रारंभ झाला. 'गणपती बाप्पा मोरया’ ‘पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष करत गेल्या सात दिवसांपासून आपल्या लाडक्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला.