‘गॅल ओगल’ धरणाला मिळणार झळाळी

By Admin | Updated: April 10, 2015 23:33 IST2015-04-10T21:25:12+5:302015-04-10T23:33:34+5:30

महाबळेश्वर पालिका : सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजूरी

'Gal Ogle' dam will get to light | ‘गॅल ओगल’ धरणाला मिळणार झळाळी

‘गॅल ओगल’ धरणाला मिळणार झळाळी

महाबळेश्वर : पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अधिक सक्षम होण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प असलेल्या ‘ग्लॅन ओगल डॅम’ची सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत दुरुस्ती करण्याच्या कामाच्या निविदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उज्ज्वला तोष्णीवाल या होत्या. यावेळी मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.शहराला सध्या वेण्णा लेक येथून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी पालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेते. पावसाळ्यात मात्र ‘ग्लॅन ओगल डॅम’मधून शहरास पाणीपुरवठा करते. हे पाणी केवळ पाच-सहा महिने पुरते. ही योजना गेली अनेक वर्षे तोट्यात असून, पालिका पाणी पुरवठ्याबाबत सक्षम होण्यासाठी धरणाची दुरुस्ती व पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी डॅम दुरुस्तीचा प्रस्ताव शासनास सादर केला. त्या कामासाठी सुमारे साडेतीन कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापैकी दीड कोटीचा निधी पालिकेच्या फंडात जमा झाला आहे. या डॅममधून गाळ काढणे, गळती थांबविण्यासाठी पिचिंग करणे व सुशोभीकरण करून उद्यान तयार करणे या कामाचा समावेश आहे. सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर सुशोभीकरण करणे, नगरपरिषदेच्या सर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविणे, मार्केट इमारत दुरुस्त करणे, आदी विषय सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: 'Gal Ogle' dam will get to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.